अतिसार नियंत्रणासाठी उपाययोजना राबवा; आरोग्य विभागाचे
आवाहन
अमरावती, दि. 19 (जिमाका): पावसाळ्यात बळवणाऱ्या
अतिसार संसर्गाला नियंत्रणासाठी स्वच्छ पाणी, संतुलित आहार, शिळे अन्न न खाने, स्वच्छ
हात धुणे, परीसर व वैयक्तिक स्वच्छता ठेवणे अशा विविध उपाययोजना राबविण्याचे आवाहन
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सूरेश असोले यांनी केले आहे.
प्राथमिक
आरोग्य केंद्र टेंभूरसोंडा अंतर्गत खटकाली या गावात अतिसाराचे रूग्ण मोठया प्रमाणात आढळूण आले होते. या घटनेची जिल्हा आरोग्य अधिकारी
डॉ. सुरेश असोले, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रविण पारिसे, साथरोग वैद्यकीय
अधिकारी तसेच इतर जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय चमू यांनी गावात भेट देऊन गावातील नागरीक,
ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य कर्मचारी यांच्या सोबत चर्चा करण्यात आली. त्यानंतर जिल्हा
आरोग्य अधिकारी यांनी येथील चौकशी करुन उपाययोजना
राबवावे. तसेच दैनंदिन क्लोरिनेशन करून ओ. टी. टेस्ट, दैनंदिन सर्वेक्षण करण्याचेही
सूचना दिल्या.
00000
No comments:
Post a Comment