Tuesday, May 4, 2021

दर्यापूर कोविड केअर सेंटरमधील खाटा वाढवा- जिल्हाधिकारी शैलेश नवाल

दर्यापूर कोविड केअर सेंटरमधील खाटा वाढवा
- जिल्हाधिकारी शैलेश नवाल

    दर्यापूर कोविड केअर सेंटरमधील खाटांची संख्या २० वरून ५० पर्यंत न्यावी, त्याचप्रमाणे, त्यात किमान १० ऑक्सिजन बेडची व्यवस्था असावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.

      जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी आज दर्यापूर व अंजनगाव सुर्जी येथे भेट देऊन तेथील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. आमदार बळवंतराव वानखडे, उपविभागीय अधिकारी मनोज लोणारकर यांच्यासह तहसीलदार, आरोग्य अधिकारी व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

         कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या अनुषंगाने दर्यापूर ग्रामीण रुग्णालयासह अंजनगाव सुर्जी तालुक्यातील रुग्णालयांना भेट देऊन जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी स्थितीचा आढावा घेतला.

          आवश्यक त्या सर्व ठिकाणी खाटांची संख्या, विशेषतः ऑक्सिजन बेडची संख्या वाढवावी. आवश्यक साधनामग्री मिळवून देण्यात येईल. लसीकरण केंद्रावर सुसज्ज व्यवस्था ठेवावी. गर्दी होऊ नये यासाठी टोकन सिस्टम राबवावी, आदी निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी यावेळी दिले.

        रुग्णालयाला आवश्यक औषधे व साधनसामग्रीही यावेळी उपलब्ध करून देण्यात आली.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 17-10-2025

                                                        जिल्हा महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी अमरावती, दि. 17 (जिमाका) : जिल्हा महिला लोकश...