Thursday, September 30, 2021

जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून संत्रा शेती व मूल्यवृद्धी प्रकल्पाची पाहणी

 







जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून संत्रा शेती व मूल्यवृद्धी प्रकल्पाची पाहणी

अमरावती, दि. 30 : संत्रा हे जिल्ह्यातील महत्वाचे फळपीक आहे. संत्रा उत्पादक शेतकरी बांधवांच्या अडचणी सोडविण्याबरोबरच संत्रा फळपीक मूल्यवृद्धी व निर्यातवृद्धीसाठी प्रयत्न व्हावेत. शेतकरी उत्पादक संस्थांचा मूल्य साखळीतील सहभाग वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी आज वरूड तालुक्याचा दौरा करून फळपीक शेतीची पाहणी व कृषी प्रकल्पांना भेटी दिल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार गजेंद्र मालठाणे, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, उपविभागीय कृषी अधिकारी राहूल सातपुते आदी उपस्थित होते.

            जिल्हाधिका-यांनी आज बेनोडा, जरूड, वरूड आदी ठिकाणी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी शेतकरी गटामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रमाची पाहणी व ई- पीक पाहणी कार्यक्रमात सहभाग घेतला. बेनोडा येथे संत्रा उत्पादक शेतक-यांनी खडका धरण येथून पाईपलाईन आणून फुलवलेल्या संत्रा बागेचीही पाहणी जिल्हाधिका-यांनी केली. मनरेगाअंतर्गत वृक्षलागवड व नर्सरीला भेट देऊन त्यांनी मनरेगाअंतर्गत अधिकाधिक विकासकामे राबविण्याचे निर्देश दिले.

                        वरूड येथील संत्रा मंडई येथे संत्रा मूल्यवृद्धीसाठी गटातर्फे उभारण्यात आलेल्या प्रकल्पाची पाहणी जिल्हाधिका-यांनी केली. या प्रकल्पाद्वारे संत्र्यांची आकारनिहाय वर्गवारी, व्हॅक्सिनेशन, निर्यातीच्या दृष्टीने मूल्यवृद्धीसाठी प्रयत्न केले जातात. शेतकरी उत्पादक संस्थांचा मूल्य साखळीतील सहभाग वाढविणे आवश्यक असून, यादृष्टीने कृषी विभाग, आत्मा व विविध विभागांनी संयुक्तपणे प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

            वरूड येथे पानी फौंडेशनतर्फे जलसंवर्धन उपक्रमात सहभागी 20 गावांना जिल्हाधिका-यांच्या हस्ते गौरविण्यात आले.  वरूड येथील तहसील कार्यालयात विविध कामकाजाचा आढावाही जिल्हाधिका-यांनी घेतला.

00000

 

 

 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 22-10-2025

  शुक्रवारी ठेवीदार शिक्षण व जनजागृती निधी शिबिर अमरावती, दि. 22 (जिमाका) : ठेवीदार शिक्षण व जनजागृती निधी अंतर्गत मिळाली नसलेल्या आर्थिक मा...