Wednesday, January 17, 2018

‘महाराष्ट्र बँक’ ही आपली बँक
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 17 : बँक ऑफ महाराष्ट्रच्या स्थलांतरित शाखेचे आज मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र बँक ही महाराष्ट्राची व आपली बँक वाटते. बँकेने अधिकाधिक प्रगती करावी,अशा शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिल्या.
यावेळी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, मुख्य सचिव सुमित मल्लिक, बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या मुख्य प्रबंधक संगिता देसाई, व्यवस्थापकीय संचालक आर. पी. मराठे, क्षेत्रिय प्रबंधक मुनिराजु व मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
या बँकेची भविष्यामध्ये सातत्याने प्रगती होत राहो. तसेच सरकारची व बँकेची तिजोरी सामान्यांसाठी कायम भरलेली राहो, अशी आशा व्यक्त करुनबँकेला जी मदत लागेल ती करण्यात येईल, असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
००००





No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 17-10-2025

                                                        जिल्हा महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी अमरावती, दि. 17 (जिमाका) : जिल्हा महिला लोकश...