Thursday, January 25, 2018

दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम
मुख्यमंत्र्यांची लक्ष्मी मित्तल यांच्याशी चर्चा

मुंबई, दि. 25: पोलाद निर्मितीत जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या आर्सेलर मित्तल कंपनीचे चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. लक्ष्मी मित्तल यांनी दावोस येथे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नियोजित गुंतवणुकीबाबत चर्चा केली.

भारतामध्ये स्पेशल ऑटोमोबाईल ग्रेड स्टील प्लँट उभारण्याचे नियोजन आर्सेलर मित्तल कंपनी करीत आहे. या भेटीप्रसंगी झालेल्या सकारात्मक चर्चेमध्ये कंपनीच्या भारतातील प्रकल्पासाठी आवश्यक आणि योग्य ते सर्व सहकार्य पुरविण्याचे आश्वासन देऊन हा प्रकल्प उभारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी राज्याच्यावतीने कंपनीला निमंत्रित केले आहे.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 17-10-2025

                                                        जिल्हा महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी अमरावती, दि. 17 (जिमाका) : जिल्हा महिला लोकश...