Wednesday, May 30, 2018



रुपी बँक संदर्भात
गुंतवणुकदारांचे हित सुरक्षित राहावे
- मुख्यमंत्री
मुंबई, दि.30  :रिझर्व्ह बॅक ऑफ इंडियाने गुंतवणुकदारांचे हित सुरक्षित राहावे या दृष्टीने रुपी बॅकेला मार्गदर्शन करावे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
रूपी बॅकेच्या संदर्भात आज मंत्रालयात आयोजित बैठकीला सहकारमंत्री सुभाष देशमुख,आरबीआयचे डेप्युटी गव्हर्नर एन.एस. विश्वनाथन,आरबीआयचेकार्यकारी संचालक सुदर्शन सेन,मुख्य महाव्यवस्थापक नीरज निगम, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस.एस. संधू यासह रूपी बॅकेच्या प्रशासकीय मंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
रूपी बॅकेतील गुंतवणुकीदारांच्या ठेवी या सर्वसामान्यांच्या आहेत.त्यामुळे गुंतवणुकदारांचे हित सुरक्षित राहण्याला प्राथम्य देण्यात यावे, असे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार