Monday, June 25, 2018

मंत्रालयातील लोकशाही दिनामध्ये सर्व अर्ज निकाली
प्रलंबित अर्जांची संख्या शुन्यावर
मुंबईदि. 25 : मंत्रालयात मे 2018 पर्यंत झालेल्या 107 लोकशाही दिनांमधील  एकही अर्ज प्रलंबित नसून 1 हजार 470 तक्रारींवर  तोडगा काढण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 108 वा लोकशाही दिन घेण्यात आला. यावेळी 11 तक्रारींवर मुख्यमंत्र्यांनी सुनावणी केली.
            दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी मंत्रालयात ऑनलाईन लोकशाही दिन आयोजित केल जात. आतापर्यंत एकूण 107 लोकशाही दिन झाले असून, 1470 तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्या तक्रारी वेळीच निकाली काढल्याने मे 2018 अखेरपर्यंत प्रलंबित अर्जांची संख्या शन्य आहे. आज झालेल्या लोकशाही दिनात सातारावसईकांदिवलीपुणेठाणे, जळगाव,बुलढाणावेंगुर्ला येथील नागरिकांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार मांडली. त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी संबंधित यंत्रणेला निर्देश दिले.
            यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तवमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीरमनीषा म्हैसकर आदी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे - जिल्हाधिकारी आशिष येरेकर

बँकांनी उद्योगांना कर्जवाटप करताना सकारात्मक रहावे    - जिल्हाधिकारी आशिष येरेकर *उद्दिष्ट प...