Monday, June 25, 2018

कायद्यातील सुधारणेस राज्यपालांनी दिली मंजुरी
मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र नसले तरी
व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार

                मुंबईदि. 24 : सन 2018-19 या शैक्षणिक वर्षांसाठीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी  प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आता जात वैधता प्रमाणपत्र नसले तरी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. मात्रही प्रक्रिया झाल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेण्यापूर्वी जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. यासंबंधी कायद्यातील सुधारणा करण्याच्या अध्यादेशास राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी मान्यता दिली आहे.

                या वर्षीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रियेत मागासवर्गात आरक्षित जागेवर प्रवेश घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची अट आहे. परंतुजात प्रमाणपत्र वैधता तपासणी समितीकडे मोठ्या प्रमाणात जात प्रमाणपत्र पडताळणी अर्ज प्रलंबित आहेत.  यामुळे अनेक विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र मिळणे शक्य होणार नाही. यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र अनुसूचित जातीअनुसूचित जमातीविमुक्त जातीभटक्या जमातीइतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग (जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन) अधिनियम, 2000 (2001 चा महा. 23), यात सुधारणा करण्यासाठी राज्यपाल श्री. राव यांना विनंती केली होती. त्यानुसार राज्यपाल महोदयांनी या सुधारणेसाठी मान्यता दिली आहे. 

                या सुधारणेनुसारयावर्षीच्या  व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या अनुसूचित जातीअनुसूचित जमातीविमुक्त जातीभटक्या जमातीइतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गमधील विद्यार्थ्यांना जात पडताळणी समितीकडे वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी अर्ज केला असल्याचा पुरावा सादर करून त्याआधारेअशा व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र महाविद्यालयात प्रवेश घेताना या विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र सादर करणे अत्यावश्यक आहे. जर विद्यार्थ्यांने प्रवेश नियामक प्राधिकरणाने विनिर्दिष्ट केलेल्या दिनांकापूर्वी वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही तर त्याचा राखीव प्रवर्गातून मिळवलेला तात्पुरता प्रवेश रद्द होणार आहे. ही तरतूद फक्त सन 2018-19 या वर्षांसाठीच्या प्रवेशासाठी लागू राहणार आहे. आदिवासी विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्या स्वाक्षरीने हा अध्यादेश काढण्यात आला आहे. 
0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 17-10-2025

                                                        जिल्हा महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी अमरावती, दि. 17 (जिमाका) : जिल्हा महिला लोकश...