Sunday, December 6, 2020

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्याकडून अभिवादन

 





महापरिनिर्वाणदिनानिमित्त कार्यक्रम

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना

पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्याकडून अभिवादन

 

संविधानाचे पावित्र्य जपण्याचा निर्धार करूया

पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 6 : स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मानवतेची महान मूल्ये संविधानाने प्रत्येक भारतीयाला दिली आहेत. संविधानाच्या या चौकटीला धक्का लावण्याचा कुणीही प्रयत्न करू नये. संविधानाचे पावित्र्य जपण्याचा निर्धार सर्वांनी करूया, असे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.

            महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब  आंबेडकर यांच्या इर्विन चौकातील पुतळ्याला  पुष्पहार अर्पण करून पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी अभिवादन केले, त्यावेळी त्या बोलत होत्या.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या रूपाने मानवतेच्या महान मूल्यांची देणगी प्रत्येक भारतीयाला दिली आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय,  एकता व एकात्मता या संविधानातील मूल्यांची जपणूक करणे व संविधानाची चौकट अबाधित ठेवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. तसा निश्चय व निर्धार नागरिक म्हणून आपण सर्वांनी करूया.

महापालिकेचे विरोधी पक्षनेते बबलू शेखावत, किशोर बोरकर, अशोक दहिकर, ज्येष्ठ पत्रकार ऍड. दिलीप एडतकर, नाना नागमुखे, उमेश घुरडे, रामभाऊ पाटील, विलास इंगोले, हरिभाऊ मोहोड, रामेश्वर अभ्यंकर, प्रफुल्ल गवई, राजकुमार मून, कमलताई कांबळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS 26-12-2025

  टपाल विभागात 'डाक जीवन विमा' प्रतिनिधींची भरती; 20 जानेवारीला मुलाखती अमरावती, दि. 26 (जिमाका):  भारतीय डाक विभागाच्या अमरावती विभ...