Saturday, April 3, 2021

                                       







                                        सायन्सकोर मैदानात विविध सुविधांची भर

ऐतिहासिक ठेव्याचे जतनसंवर्धन

पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावतीदि. ३ : जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या मोठ्या शक्यता असूनकौंडण्यपूरचिखलदरालासूरसारख्या प्राचीनपौराणिक स्थळांबरोबरच ऐतिहासिक स्थळांचेही जतनसंवर्धनाचे काम शासनाने हाती घेतले आहे. अमरावती शहरातील  सायन्सकोर मैदानाच्या सौंदर्यीकरणाचे कामही लवकरच पूर्णत्वास जाईलअसे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज  सांगितले.

जिल्ह्यात विविध पौराणिकऐतिहासिक व निसर्गसुंदर स्थळांत विविध सुविधांची भर घालून त्यांचे जतन व संवर्धनासाठी शासनाकडूनतसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अनेकविध प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत.

          जिल्ह्यातील प्राचीनऐतिहासिक बाबींची माहिती देणारे प्रदर्शन व संग्रहालयराष्ट्रसंत तुकडोजी महाराजजिल्ह्यातील संत व महापुरुषांचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यायासाठी जेजे स्कूल ऑफ आर्टस् या संस्थेकडून विशेष प्रकल्पचिखलदरा येथे अनेकविध कलाकृतींतून सौंदर्यीकरण अशी कितीतरी कामे आकारास येत आहेत. त्याचअंतर्गत ऐतिहासिक सायन्सकोर मैदानाचे जतन व सौंदर्यीकरणाचे कामही होत आहे. अमरावती ही संतमहापुरुषांची भूमी आहे. हा ऐतिहासिक ठेवा जपला जावाशहराच्याजिल्ह्यातील सुविधांमध्येसौंदर्यात भर पडावी यासाठी अनेक कामे होत आहेत. त्यासाठी निधीची उणीव भासू देणार नाहीअशी ग्वाही पालकमंत्री ऍड. ठाकूर यांनी दिली.

सुमारे १ कोटी २० लक्ष रुपये निधीतून सायन्सकोर मैदानावर विविध सुविधांची निर्मिती होत आहे.मैदानाला कुंपण भिंत व मुख्य प्रवेशद्वाराच्या कामाने वेग घेतला आहे. मैदानाचे समतलीकरण करण्यात आले असूनवाकिंग ट्रॅकचेही काम लवकरच पूर्णत्वास जाणार आहेअशी माहिती उपअभियंता विशाल मुंडाणे यांनी दिली.

सायन्सकोर मैदान हे मोठे क्षेत्रफळ असलेले विशाल व शहरातील मध्यवर्ती मैदान आहे. विविध सुविधांच्या उभारणीमुळे सौंदर्यात भर तर पडेलचशिवाय ट्रॅक उभारल्यामुळे नागरिकांना सुविधा मिळेल. त्याचप्रमाणेकुंपण भिंतीमुळे सुरक्षितता जपली जाणार आहे.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 17-10-2025

                                                        जिल्हा महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी अमरावती, दि. 17 (जिमाका) : जिल्हा महिला लोकश...