Saturday, April 3, 2021

तळेगाव येथील गॅस दुर्घटनाग्रस्तांना पालकमंत्र्यांकडून दिलासा सर्वतोपरी मदत मिळवून देणार - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

              









  तळेगाव येथील गॅस दुर्घटनाग्रस्तांना पालकमंत्र्यांकडून दिलासा

सर्वतोपरी मदत मिळवून देणार

पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

गॅस कीटचे वितरण

 

अमरावतीदि. ३ : तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील गॅस सिलेंडर स्फोट दुर्घटनेत घराची हानी झालेल्या कुटूंबाला पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी भेट देऊन दिलासा दिला.

तळेगाव ठाकूर येथील गोमासे कुटुंबाकडे गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन घराचे नुकसान झाले. पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी आज तळेगावला भेट देऊन या कुटुंबाला भेट दिली. प्र. तहसीलदार उमेश खोडके व अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

यावेळी या कुटुंबाला पालकमंत्र्यांच्या हस्ते गॅस शेगडीसिलेंडर व धान्य शिधा देण्यात आला. त्याचबरोबरनुकसानाबाबत शक्य ती सर्व मदत मिळवून देण्यात येईलअसे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

या कुटुंबाला मदत मिळवून देण्यासाठी संबंधित गॅस कंपनीकडे प्रकरण तात्काळ पाठविण्यात येणार आहेअशी माहिती प्र. तहसीलदार श्री. खोडके यांनी दिली.

 


--

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 10.06.2026

  शुक्रवारी जागतिक बाल कामगार प्रथाविरोधी दिन अमरावती, दि. 10 (जिमाका) : बालमजुरी या अनिष्ठ प्रथेविरूद्ध विस्तृत प्रमाणात जनजागृती करणे आवश्...