Tuesday, September 1, 2026

DIO NEWS AMRAVATI 01.09.2026


 जवाहर नवोदय विद्यालयाच्या 9 वी व 11 वी  प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

अर्ज करण्याची अंतिम तारिख 30 सप्टेंबर ; पुढील वर्षी 10 एप्रिलला प्रवेश परीक्षा

 

अमरावती, दि. 1 (जिमाका) : येथील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये  शैक्षणिक वर्ष 2027-28 साठी इयत्ता 9 वी व 11 वी प्रवेशाकरिता ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 1 ते 30 सप्टेंबर 2026 दरम्यान ऑनलाईल अर्ज करता येणार असून शनिवार, 10 एप्रिल 2027 रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे.

 

         इच्छुक विद्यार्थ्यांना नवोदय विद्यालय समितीच्या navoday.gov.in संकेतस्थळावर‍ किंवा इयत्ता 11 वी करिता cbseitms.nic.in/2026/nvsix_11 आणि इयत्ता 9वी करिता cbseitms.nic.in/2026/nvsix_9 अधिकृत संकेतस्थळावर नि:शुल्क अर्ज भरता येणार आहे. विद्यार्थी -विद्यार्थीनी ही अमरावती जिल्हयातील रहिवासी व याच जिल्ह्यातील मान्यताप्राप्त शाळेतून शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये इयत्ता 10 आणि इयत्ता 8वीत क्रमश: इयत्ता 11 वी व 9वीच्या प्रवेशासाठी अध्ययनरत असणे आवश्यक आहे. 9वी प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांचा जन्म 1 मे 2012 ते ३१ जुलै २०१४ आणि १० वी प्रवेशाकरिता १ जून २०१० ते ३१ जुलै २०१२ दरम्यान असावा. आरक्षित आणि अनारक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी जन्म तारखेची अट सारखीच आहे.अधिक माहितीसाठी navoday.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधता येणार आहे.   

                                                              ०००००  

  

आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहांसाठी भाडेतत्वावर इमारत उपलब्ध करूण देण्याचे आवाहन

 

अमरावती, दि. 1 (जिमाका) : प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी अंतर्गत अमरावती शहरातील आदिवासी मुलांच्या तीन वसतिगृहांच्या मंजूर क्षमतेमध्ये वाढ झाल्याने नवीन सुसज्ज इमारतीसाठी  भाडेतत्वावर येत्या सात दिवसात प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. 

 

         गाडगेनगर स्थित आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह क्र. 1च्या मंजूर क्षमतेत वाढ होवून 100 विद्यार्थी झाली आहे. राठीनगर स्थित आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह क्र. 2 ची विद्यार्थी क्षमता वाढून 125 झाली आहे आणि दस्तुरनगर येथील आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह क्र. 3 ची क्षमता वाढून 180 झाली आहे. या तिन्ही वसतिगृहांमध्ये प्रवेशीत विद्यार्थ्यांच्या निवासासाठी नवीन, सुरक्षित व सुसज्ज इमारत भाडेतत्वाने घेणे आहे. या इमारतीमध्ये विद्यार्थ्यांसाठी निवास कक्ष, कार्यालय, संगणक कक्ष, वाचनालय, अभ्यासिका, भोजनकक्ष, स्वयंपाकगृह, स्टोअर रूम, वैद्यकीय कक्ष, शौचालय व स्नानगृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वीज व्यवस्था, सौरऊर्जा प्रणाली, पावसाचे पाणी साठवण व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षा व्यवस्था, वाहनतळ तसेच आवश्यक फर्निचर व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध असाव्यात.

 

             ही इमारत अमरावती शहाराच्या मध्यवर्ती व शैक्षणिक परिसराच्या जवळ असावी. इच्छुक इमारत मालकांनी प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी या कार्यालयात किंवा अमरावती येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहातील गृहप्रमुख किंवा गृहपालास कार्यालयीन वेळेत येत्या सात दिवसात कागदपत्रांसह प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन, प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास धारणी कार्यालयाचे सहायक प्रकल्प अधिकारी (वसतीगृह)  यांनी केले आहे.

                                                                 ०००००        

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 01.09.2026

  जवाहर नवोदय विद्यालयाच्या 9 वी व 11 वी  प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन अर्ज करण्याची अंतिम तारिख 30 सप्टेंबर ; पुढील वर्षी 10 एप्र...