Thursday, September 6, 2018

दिलखुलास कार्यक्रमात आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत


'स्क्रब टायफस आणि अन्य साथीचे रोग : असा करू मुकाबला'
         मुंबईदि. 6 : माहिती  व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास कार्यक्रमात 'स्क्रब टायफस आणि अन्य साथीचे रोग : असा करू मुकाबला या विषयावर मंत्री डॉ. दीपक सावंत यांची विशेष मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शुक्रवार दि. ७ आणि शनिवार दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक सुरेश ठमके यांनी ही मुलाखत घेतली आहे.
राज्यातील आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी शासनाने उचललेली ठोस पाऊलेपावसाळयात साथीचे आजार उद्भवू नये यासाठी आरोग्य विभागाने घेतलेली खबरदारीस्वाईन फ्ल्यूलेप्टो, डेंग्यूस्क्रब टायफस या आजाराबाबत घ्यावयाची काळजीस्वाईन फ्ल्यूचा प्रादूर्भाव रोखण्याबाबत तसेच विषाणूजन्य रोगांच्या अभ्यासासाठी उभारण्यात आलेली व्हॉयरॉलॉजी प्रयोगशाळा याबाबतची माहिती डॉ.सावंत यांनी दिलखुलास कार्यक्रमातून दिली आहे.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 10.06.2026

  शुक्रवारी जागतिक बाल कामगार प्रथाविरोधी दिन अमरावती, दि. 10 (जिमाका) : बालमजुरी या अनिष्ठ प्रथेविरूद्ध विस्तृत प्रमाणात जनजागृती करणे आवश्...