Saturday, September 29, 2018

‘आपले शासन, आपल्या योजना’चे पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन



          अमरावती, दि. 29 : जिल्हा माहिती कार्यालयातर्फे शासनाच्या विविध योजनांची माहिती असलेल्या ‘आपले शासन, आपल्या योजना’ या घडिपुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्याहस्ते आज येथे झाले.
          नगरसेवक सचिन रासने, राजेश साहू, राधाताई कुरील, राजू कुरील, डॉ.प्रणय कुलकर्णी, पालकमंत्र्यांचे स्वीय सचिव अनिल भटकर, राजेश बोबडे व जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार उपस्थित होते.
          पुस्तिकेत प्रधानमंत्री आवास योजना, मातृवंदना योजना, सुरक्षित मातृत्व अभियान, कृषी स्वावलंबन योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, प्रधानमंत्री जनधन योजना यासह अनेक महत्वाच्या लोकोपयोगी योजनांची उपयुक्त माहिती समाविष्ट आहे. जिल्हाभरात त्याचे वितरण करण्यात येईल, असे श्री. पवार यावेळी म्हणाले.
00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार