Tuesday, February 19, 2019

पालकमंत्री यांच्याकडून छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन




अमरावती, दि. 19 – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी शिवटेकडीवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती विवेक कलोती, जयंत डेहणकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श प्रशासक, कुशल योद्धा व महान राजा होते. त्यांचे जीवनकार्य प्रत्येक पिढीला प्रेरणादायी ठरणारे आहे, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार