Sunday, June 2, 2019

महाराष्ट्र ग्राम परिवर्तन अभियान जिल्हाधिकाऱ्यांकडून मेळघाटातील प्रकल्पांची पाहणी





अमरावती, दि. 2 :  महाराष्ट्र ग्राम परिवर्तन अभियानाद्वारे  मेळघाटातील विविध गावांत राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पांची जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी काल शनिवारी पाहणी केली.
जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी धारणी तालुक्यातील बोड, बेदरबल्ला, भूलोरी आदी गावांना भेट दिली. महाराष्ट्र ग्राम परिवर्तन अभियानाद्वारे या गावात परसातील कुक्कुटपालन, ग्राम उद्योग केंद्र, महिला बचत गट, जलसंधारण आदी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत . त्यांची पाहणी श्री. नवाल यांनी केली. जलयुक्त शिवार योजनेची कामे अधिक गतीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
भूलोरी येथील आगीच्या दुर्घटनेत नुकसान झालेल्या घरांची पाहणी केली. नागरिकांकडून त्यांनी अडचणी जाणून घेतल्या व  त्यांचे निराकरण करण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देश दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार