Wednesday, June 26, 2019

समता दिंडीला शहरात मोठा प्रतिसाद





अमरावती, दि. 26 : राजर्षी शाहू महाराज यांची जयंती अर्थात समतादिनानिमित्त सामाजिक न्याय विभागातर्फे काढण्यात आलेल्या समता दिंडीला आज शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
इर्विन चौकापासून सकाळी आठच्या सुमारास या दिंडीला सुरुवात झाली. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इर्विन चौकातील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नितीन गोंडाणे, श्रीमती वसुधाताई बोंडे यांच्या हस्ते हारार्पण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून समता दिंडी मार्गस्थ झाली.
दिंडीत विविध शाळा- महाविद्यालयांच्या सुमारे अडीचशे विद्यार्थी- विद्यार्थिनींचा सहभाग होता. इर्विन चौक, दुर्गावती चौक, मालटेकडी चौक ते सामाजिक न्यायभवन असा दिंडीचा मार्ग होता.  
सहायक समाजकल्याण आयुक्त मंगला मून, जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रशांत थोरात, समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप काळे यांच्यासह अनेक मान्यवर दिंडीत सहभागी झाले होते.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 17-10-2025

                                                        जिल्हा महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी अमरावती, दि. 17 (जिमाका) : जिल्हा महिला लोकश...