Sunday, July 7, 2019

पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांची जनसंपर्क टीम जाहीर


         
अमरावती, दि. 7 : महाराष्ट्राचे कृषी मंत्री तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अनिल बोंडे यांची मुंबई व अमरावती जिल्ह्यातील कार्यालयीन संपर्क टीमची माहिती नागरिकांच्या माहितीसाठी जाहीर करण्यात आली आहे.
          पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यातील कार्यालयात विशेष कार्य अधिकारी म्हणून गजेंद्र मालठाणे (भ्रमणध्वनी : 9970087100), स्वीय सहायक म्हणून वीरेंद्र गलफट (9665416999) व कार्यालयीन सहायक म्हणून रविंद्र पांडे (9421818947) काम पाहत आहेत.
          नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी टीममधील अधिकारी विविध तहसील कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. श्री. गलफट हे प्रत्येक मंगळवारी मोर्शी व बुधवारी वरुड तहसील कार्यालयात पालकमंत्र्याचे स्वीय सहायक तथा संपर्क अधिकारी म्हणून उपस्थित असतील. इतर तहसील कार्यालयात पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी व स्वीय सहाय्यक तथा संपर्क अधिकारी वेळोवेळी उपस्थित राहतील व त्याची माहिती वेळोवेळी जाहीर केली जाईल. 
            मुंबई कार्यालयात खासगी सचिव म्हणून अनिल उगले, तर मंत्री महोदयांच्या दौ-यात स्वीय सहायक जीवन कडू उपस्थित असतील. मंत्रालयात विशेष कार्य अधिकारी  नागनाथ ढोले, स्वीय सहायक सुनील सोमवंशी, अमिन काळे श्री. ढोले कामकाज सांभाळतील.
           नागरिकांनी आपल्या प्रलंबित तक्रारी, मागणी आदी तहसील कार्यालयात नोंदवाव्यात. संपर्क अधिका-यांकडून त्यावर वेळोवेळी कार्यवाही केली जाईल, असे आवाहन करण्यात आले आहे.
00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 10.06.2026

  शुक्रवारी जागतिक बाल कामगार प्रथाविरोधी दिन अमरावती, दि. 10 (जिमाका) : बालमजुरी या अनिष्ठ प्रथेविरूद्ध विस्तृत प्रमाणात जनजागृती करणे आवश्...