Sunday, March 14, 2021

 




 

विविध विकासकामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

तिवसा-भातकुली तालुक्यात रस्तेविकासासाठी साडेनऊ कोटी

प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करा

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. 13 : रस्ते, पूल, इमारती आदी पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही देतानाच-प्रत्येक काम गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या  पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी यंत्रणेला दिले.

वरखेड मार्डा जहांगीरपूर अंजनसिंगी प्रजिमा ३९ मध्ये रस्त्याची सुधारणा करणे, यावली डवरगव्हाण मोझरी रस्ता ३०८ मध्ये रस्त्याची सुधारणा करणे व डवरगाव मोझरी वऱ्हा रस्त्याची रस्त्याची सुधारणा करणे आदी एकूण साडेनऊ कोटींच्या रस्ते विकासकामांचे भूमीपूजन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते त्यावेळी त्या बोलत होत्या.

जिल्हापरिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती श्रीमती  पूजा आमले, तिवसा पंचायत समिती सभापती श्रीमती शिल्पा हाडे, उपसभापती शरद वानखेडे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंता विभावरी वैद्य  यांच्यासह नागरिक उपस्थित होते.

तिवसा, भातकुली, अमरावती तालुक्यातील वरखेड, मार्डा, जहागीरपूर, मालधूर, गुरुकुंज मोझरी, नांदगावपेठ, खोलापूर, टाकरखेडा संभू परिसरातील विविध गावे, खेड्यापाड्यातील नागरिकांना या विकासकामांचा लाभ होणार आहे.

विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही. मात्र, सार्वजनिक बांधकाम प्रशासननेही  कामे जलद गतीने करावी. वेळेची मर्यादा पाळावी. नागरिकांची गैरसोय होता कामा नये. प्रत्येक काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण होईल यावर विशेष लक्ष देण्यात यावे असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी दिले. 

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या कार्य व विचारांची ओळख संपूर्ण देशाला आहे. महाराजांची कर्मभूमी गुरुकुंज मोझरी अमरावती - नागपूर महामार्गावर आहे. आदर्श ग्राम म्हणून ओळखले जाणारे मोझरी व परिसर नागरी सुविधांनी परिपूर्ण  करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.

मोझरी बसस्थानकापासून मोझरी गावापर्यंत रस्त्याचे  रुंदीकरण आणि  डांबरीकरण होणार असल्याची माहिती अभियंता  श्रीमती वैद्य यांनी दिली.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 17-10-2025

                                                        जिल्हा महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी अमरावती, दि. 17 (जिमाका) : जिल्हा महिला लोकश...