Monday, March 1, 2021

कंटेनमेंट झोनमध्ये घरोघर तपासणी करा - केंद्रीय पथकाची सूचना

 




केंद्रीय पथकाकडून शहराची पाहणी

कंटेनमेंट झोनमध्ये घरोघर तपासणी करा

- केंद्रीय पथकाची सूचना

 

अमरावती, दि. 1 :  कोरोनाबाधितांचे आधिक्य असलेल्या परिसराला कंटेनमेंट झोन घोषित करून तेथे घरोघर तपासणी मोहिम राबविण्याचे निर्देश केंद्रीय पथकाने आज दिले. कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांच्या अनुषंगाने अमरावती विभागातील कोरोना वाढीची कारणे जाणून घेण्यासाठी केंद्र शासनाकडून केंद्रिय सहसचिव निपुण विनायक, एनसीडीसीचे उपसंचालक डॉ. संकेत कुलकर्णी, तज्ज्ञ डॉ. आशिष रंजन यांची टीम नियुक्त करण्यात आली. या टीममधील सहसचिव श्री. विनायक यांनी अमरावती शहराला भेट देऊन पाहणी केली व प्रशासनाशी चर्चा केली.

श्री. विनायक यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी दिलीप रणमले, डॉ. रेवती साबळे, डॉ. विशाल काळे यांच्याशी चर्चा करून त्यांनी  परिस्थितीची माहिती घेतली. अकोला जिल्हाधिकारी व अधिका-यांकडून अकोला जिल्ह्याची माहितीही त्यांनी घेतली.

कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांत गर्दी टाळणे सर्वात आवश्यक आहे. त्यामुळे सार्वजनिक आणखी गर्दी कशी कमी करता येईल, यादृष्टीने अंमलबजावणी व्हावी. जिथे रूग्ण अधिक प्रमाणावर आढळून येत आहेत, तिथे कंटेनमेंट झोन घोषित करून लगेच सर्वेक्षण करून घरोघर तपासणी करावी, असे निर्देश श्री. विनायक यांनी दिले. प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग तसेच पोलिस यंत्रणा यांच्यात उत्तम समन्वय असणे गरजेचे आहे. कोरोनाला रोखण्यासाठी टीमवर्क म्हणून काम करावे, असेही निर्देश त्यांनी दिले.

 

 

 

बैठकीनंतर त्यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलला भेट देऊन त्यांनी कोरोना रुग्णांसाठी असलेल्या सोयीसुविधांची पाहणी केली. यानंतर त्यांनी शहरातील श्रीकृष्णपेठ येथील प्रतिबंधित क्षेत्राला भेट दिली.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 10.06.2026

  शुक्रवारी जागतिक बाल कामगार प्रथाविरोधी दिन अमरावती, दि. 10 (जिमाका) : बालमजुरी या अनिष्ठ प्रथेविरूद्ध विस्तृत प्रमाणात जनजागृती करणे आवश्...