Official Blogger Account of District Information Office, Amravati DGIPR, Government of Maharashtra
Monday, February 23, 2026
कर्जतच्या भालिवडीत घुमला राष्ट्रभक्तीचा जागर! श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहिदी समागमानिमित्त शासकीय कन्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनींनी साकारली 'अखंड भारताची' भव्य मानवी प्रतिकृती.
"हिंद-दी-चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागमाची जय्यत तयारी! 🚩 त्यांच्या महान त्यागाला आणि शिकवणीला विनम्र अभिवादन. चला, या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊया!
"हिंद-दी-चादर" श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागमाची जय्यत तयारी!
त्यांच्या महान त्यागाला आणि शिकवणीला विनम्र अभिवादन. चला, या पवित्र सोहळ्यात सहभागी होऊया!
#GuruTeghBahadurJi #ShaheediSamagam #HindDiChadar #Kharghar #NaviMumbai #Sikhism
"नवी मुंबईतील खारघर येथे श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागमाची जय्यत तयारी! 🚩 एक भव्य आणि दिव्य सोहळा अनुभवायला नक्की या. 📍 ओवे मैदान, सेक्टर २९, खारघर. दिनांक: २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६."
"नवी मुंबईतील खारघर येथे श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या ३५० व्या शहीदी समागमाची जय्यत तयारी! एक भव्य आणि दिव्य सोहळा अनुभवायला नक्की या.
ओवे मैदान, सेक्टर २९, खारघर.
दिनांक: २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६."
#khargharsamagam #ShahidiSamagam #navimumbai #guruteghbahadursahibji #kharghar
#हिंददीचादर धर्म आणि मानवतेच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या श्री गुरु तेग बहादूर साहिबजींच्या स्मृतीप्रित्यर्थ नवी मुंबईत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
#हिंददीचादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मंगल प्रसंगी राज्यमंत्री (अल्पसंख्याक विकास व औकाफ) माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
#हिंददीचादर श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागमानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या मंगल प्रसंगी राज्यमंत्री (अल्पसंख्याक विकास व औकाफ) माधुरी मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.#khargharsamagam '
#ShahidiSamagam
#navimumbai
@MahaDGIPR
DIO NEWS AMRAVATI 23-02-2026
जिल्हाधिकारी कार्यालयात संत गाडगेबाबा जयंती साजरी
अमरावती, दि. 23 (जिमाका): जिल्हाधिकारी कार्यालयात आज संत गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी संतोष काकडे यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी अधिक्षक निलेख खटके यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
00000
जिल्हाधिकाऱ्यांकडून राणीघाट अपघातातील जखमींची विचारपूस
अमरावती, दि. 23 (जिमाका) : धारणी तालुक्यातील राणीघाटामध्ये झालेल्या अपघातातील पाच जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांची जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी भेट घेऊन अपघात आणि प्रकृतीची माहिती घेतली. तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याची सूचना केली.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनोद पवार आदी उपस्थित होते.
अपघातामधील अर्चना दारासिंगे, रा. कंजोली, गेरुबाई देवळे, रा. मोठेखेडे, रिता राठोड, रा. सिनंबद, देवा धांडे, रा. कंजोली, मुनी दहीकर, रा. कंजोली, विकेश दहीकर, सालाई, सर्व ता. धारणी यांना जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील रिता राठोड यांचा आज सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी सुरवातीला अपघात कक्षातील जखमी भुनी दहीकर यांना भेट दिली. यावेळी त्यांनी नातेवाईकांकडून अपघाताची माहिती घेतली. अपघात कशाप्रकारे घडला, वाहनात किती नागरिक होते, अपघाताचे कारण आदींची माहित घेण्यात आली. त्यानंतर अपघातातील अर्चना दारसिंगे या गर्भवती महिलेची भेट घेतली. अपघातामुळे माता व बाळ दोन्ही सुरक्षित ठेवण्यासाठी उपचार करावेत. त्यांची तब्येत पूर्ण बरी झाल्यानंतरच रूग्णालयातून सुट्टी द्यावी, अशा सुचना केल्या. शल्यचिकित्सा कक्षात दोन जणांवर शस्त्रक्रीया करण्यात येत आहे. याठिकाणीही श्री. येरेकर यांनी भेट देऊन जखमींच्या नातेवाईकांकडून माहिती घेतली.
राणीघाटातील अपघाताला वाहनचालक कारणीभूत आहेत. वाहनचालकाने वाहन सुस्थितीत नसताना माल आणि प्रवासी जादा प्रमाणात भरले. तसेच धावत्या वाहनामध्येच बिघाड झाल्याने पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यातील जमखींची विशेष उपचार देऊन मृत्यू होऊ नये, याची काळजी घ्यावी. अपघातातील जखमींवर मोफत उपचार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे जखमींनी पूर्ण उपचार घेऊन घरी जावे. जखमींवर योग्य उपचार करावेत. आवश्यकता भासल्यास खासगी डॉक्टरांची सेवा घेण्यात यावी. जखमी आणि त्यांच्या नातेवाईकांनीही उपचारासाठी सहकार्य करावे, असे श्री. येरेकर यांनी सांगितले.
मेळघाटमध्ये झालेल्या अपघातातील वाहनचालकांवर सक्त कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांना दिल्या.
00000
दलित वस्ती सुधार योजनेतील कामांना गती मिळणार
*670 विकासकामांवरील स्थगिती उठवली
अमरावती, दि. 23 (जिमाका) : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करण्यासाठी सन 2025-26 या वर्षाकरिता मंजूर करण्यात आलेल्या 670 विकासकामांवरील स्थगिती उठवण्यात आली आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार कामांमध्ये बदल करून विकासकामे करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांना वेग मिळणार आहे.
जिल्हा परिषद समाज कल्याण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या या योजनेंतर्गत सांडपाणी निचऱ्यासाठी नाली, पाणीपुरवठा, सिमेंट रस्ते, एलईडी लाईट आणि पेविंग ब्लॉक बसवणे यांसारख्या 670 कामांची निवड करण्यात आली होती. मात्र, या कामांमध्ये रस्ते आणि पेविंग ब्लॉकच्या कामांचे प्रमाण जास्त असल्याने ही कामे बदलविण्याची सूचना पालकमंत्री श्री. बावनकुळे यांनी केली होती. तसेच सांडपाणी व्यवस्थापन, गटार व्यवस्था आणि पाणीपुरवठा यासारख्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले होते. या निर्देशानुसार, गट विकास अधिकाऱ्यांनी जुन्या यादीतील 112 कामांमध्ये बदल करून नवीन कामांचे प्रस्ताव सादर केले आहेत. त्यामुळे आता 670 विकासकामे सुरू होणार आहे.
या कामांमध्ये रस्ते आणि पेविंग ब्लॉकऐवजी आता आरोग्य आणि स्वच्छतेशी संबंधित कामांमध्ये गटारे, पाणीपुरवठा यावर भर दिला जाणार आहे. सर्व कामांचे जिओ टॅगिंग आणि छायाचित्र पालकमंत्र्यांसमोर सादर करण्यात आले आहेत. बदललेल्या 112 कामांचे प्रस्ताव ग्रामपंचायत ठराव, प्रमाणपत्रे आणि अंदाजपत्रकासह तातडीने प्रशासकीय मान्यतेसाठी सादर करावेत, असे आवाहन जिल्हा समाज कल्याण अधिकारी डी. एम. पुंड यांनी केले आहे.
00000
"हिन्द-दी-चादर" कार्यक्रम के अनुरूप श्री गुरुसिंह सभा गुरुद्वारा एवं वसई विरार शहर नगर निगम द्वारा संयुक्त रूप से निकाली गई जनजागरण रैली. #khargharsamagam #ShahidiSamagam #navimumbai #guruteghbahadursahibji #kharghar
#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६
#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #अहिल्यादेवीहोळकर #कर्जमुक्तीयोजना2026 #FarmerWelfare #...
-
पालकमंत्र्यांनी घेतला जिल्हा नियोजन समितीचा आढावा; 679 कोटी मंजूर निधीच्या कामांचे प्रस्ताव तात्काळ सादर करा - पालकमंत्री चंद...
-
महसूल दिनी एक लाख वृक्षारोपण होणार *आजपासून महसूल सप्ताहाचे आयोजन; विविध कार्यक्रमांची रेलचेल अमरावती, दि. ३१ : महसूल दिनाच्या निमित्ताने १ ...
-
खरीप पीक कर्जवितरणाला गती देण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश कर्जवितरणाचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करा - पालकमंत...


.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)