Thursday, August 23, 2018

साद्राबाडी परिसराकडे ‘जीएसआय’चे तज्ज्ञ पथक रवाना ‘एनसीएस’चे पथकही आज दाखल होणार


अमरावती, दि. २३ : धारणी तालुक्यातील साद्राबाडी व परिसरातील भूकंपसदृश घटनांबाबत नेमके कारण व शास्त्रीयदृष्ट्या तपासासाठी ‘जीएसआय’ (जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया) व ‘एनसीएस’ (नॅशनल सेंटर फॉर सिस्मोग्राफ) या दोन्ही संस्थांच्या तज्ज्ञांची स्वतंत्र पथके साद्राबाडीत दाखल होत आहेत.
            ‘जीएसआय’च्या पथकात भूवैज्ञानिक श्री. प्रसाद, संजय वानखडे यांचा समावेश असून, ते आज   अमरावतीहून साद्राबाडीकडे रवाना झाले. राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल सेंटर फॉर सिस्मोग्राफ या संस्थेच्या तज्ज्ञाचे पथकही दिल्लीहून उद्या (दि. २४) सकाळी नागपूरमार्गे साद्राबाडी येथे दाखल होणार आहे.  ‘एनसीएस’च्या पथकात तज्ज्ञ कुलबीर सिंह आणि बबन सिंह यांचा समावेश आहे. या दोन्ही पथकांच्या अहवालानुसार भूकंपसदृश घटनांचे शास्त्रीय कारण कळू शकेल.  
शासनाच्या सर्व विभागांच्या समन्वयातून सुसज्ज यंत्रणा साद्राबाडी येथे पूर्णवेळ कार्यरत आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी दिली.

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार