Wednesday, August 15, 2018

जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रध्वज वंदन समारंभ उत्साहात


           
अमरावती, दि. 15 :  भारतीय स्वातंत्र्याच्या 71 व्या वर्धापनदिनोत्सवानिमित्त  जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रध्वज वंदन  समारंभ जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या हस्ते झाले.
            प्रारंभी श्री. बांगर यांच्या हस्ते ध्वजारोहण व राष्ट्रगीत झाले. पोलीस पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.  श्री. बांगर यांनी सर्व उपस्थित अधिकारी- कर्मचारी यांच्याशी हस्तांदोलन करुन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.   त्यानंतर चहापानाचा कार्यक्रम झाला. जिल्हाधिका-यांनी सर्व अधिकारी- कर्मचा-यांशी यावेळी संवाद साधला.
 आपत्ती व्यवस्थापनात महत्वाची कामगिरी बजावणा-या विविध अधिकारी- कर्मचा-यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.  अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, अजय लहाने, आर. डी. काळे, विनोद शिरभाते, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी अनिल भटकर, जिल्हा सूचना अधिकारी अरुण रणवीर, विधी अधिकारी श्री. बोहरा, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांच्यासह अनेक अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
                               



No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार