Saturday, May 16, 2020

कोविड रूग्णालयातून आज सहाजणांना डिस्चार्ज



अमरावती, दि. 16 : येथील कोविड रूग्णालयातून आज तीन पुरुष व तीन महिला अशा सहाजणांना डिस्चार्ज देण्यात आला.

त्यातील एक पुरुष आझाद कॉलनी येथील आहे. उर्वरित सर्वजण ताजनगर येथील आहेत. रुग्णालयात दाखल या सर्व रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल उपचारानंतर निगेटिव्ह आला. मोठ्या संख्येने रूग्ण उपचारानंतर घरी परतत असल्याने ही बाब दिलासा देणारी ठरली असून, वैद्यकीय यंत्रणेने या सर्वांचे अभिनंदन करत त्यांना निरोप दिला. हे सर्व नागरिक पुढील 14 दिवस क्वारंटाईन राहतील. त्यांना दक्षतेबाबत आवश्यक सूचना जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्याकडून देण्यात आल्या. या सर्व नागरिकांना मिठाईही वाटण्यात आली.

कोरोना हा योग्य उपचारानंतर बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी कुठलीही लक्षणे दिसताच तत्काळ तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

                                    000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार