Saturday, June 20, 2020

पालकमंत्र्यांकडून रुपाली मोगरकर यांचा सत्कार


          राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तहसीलदारपदी नियुक्त झालेल्या कु. रूपाली मोगरकर यांचा सत्कार राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते आज झाला.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी रुपाली मोगरकर यांच्या घरी जाऊन त्यांचा गौरव केला. रुपालीच्या यशाबद्दल अभिनंदन करत श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, विदर्भातून महिला अधिकारी म्हणून राज्याच्या सेवेत जात आहेत, ही खरेच अभिमानाची गोष्ट आहे.  स्पर्धात्मक परीक्षांत मुलींची टक्केवारी वाढली पाहिजे. जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांत यश मिळावे यासाठी प्रशासनाकडून भरीव उपक्रम राबविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

यावेळी मोगरकर कुटुंबीय व अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.

 

00000


No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार