Wednesday, November 11, 2020

अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकअंध मतदारांसाठी सहायक नेमण्याबाबत कार्यवाहीचे निर्देश


अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक
अंध मतदारांसाठी सहायक नेमण्याबाबत कार्यवाहीचे निर्देश

      निवडणूक प्रक्रियेत अंध मतदारांसाठी सहायक नेमण्याची तरतूद आहे. त्यानुसार शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठीही जिल्ह्यात अंध मतदार असल्यास त्यांच्यासाठी सहायक नेमण्याची कार्यवाही व्हावी, असे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी पीयूष सिंह यांनी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत.
       अंध मतदारांनी मतदानाच्या दिनांकापूर्वी तीन दिवस आधी सहायक मिळण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे अर्ज करणे आवश्यक आहे. या तरतुदी बाबत दिव्यांग मतदार यादीतील अंध बांधवांशी संपर्क साधून त्यांच्यार्यंत माहिती पोहोचवावी व ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
  ०००

No comments:

Post a Comment

DIO NEWS 26-12-2025

  टपाल विभागात 'डाक जीवन विमा' प्रतिनिधींची भरती; 20 जानेवारीला मुलाखती अमरावती, दि. 26 (जिमाका):  भारतीय डाक विभागाच्या अमरावती विभ...