Thursday, November 12, 2020

मतदान प्रक्रियेबाबत प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण


मतदान प्रक्रियेबाबत प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण

      अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मतदान अधिकारी व सूक्ष्म निरीक्षकांसाठी विभागातील सर्व जिल्ह्यांत 18 ते 22 नोव्हेंबरदरम्यान प्रशिक्षण सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. त्यासाठी मास्टर ट्रेनरच्या नियुक्तीचा आदेश निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पीयुष सिंह यांनी जारी केला.

     विभागीय आयुक्त कार्यालयातील सहायक आयुक्त (भूसुधार) श्यामकांत म्हस्के व तिवसा-भातकुलीचे उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले यांना मास्टर ट्रेनर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. मतदान प्रक्रियेबाबत प्रत्येक जिल्ह्यात प्रशिक्षण आयोजित करणे, नियुक्त मतदान अधिकारी व सूक्ष्म निरीक्षक यांना प्रशिक्षण देणे, मतमोजणी प्रक्रियेबाबत निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयस्तरावर प्रशिक्षण आयोजित करणे, प्रशिक्षण साहित्य तयार करणे, नियुक्त अधिकारी व कर्मचारी यांच्याशी नियमित समन्वय ठेवून मतदान व मतमोजणी अनुषंगिक साहित्य पुरविणे आदी जबाबदारी मास्टर ट्रेनर यांना देण्यात आली आहे.
                                                      
               0000

No comments:

Post a Comment

DIO NEWS 26-12-2025

  टपाल विभागात 'डाक जीवन विमा' प्रतिनिधींची भरती; 20 जानेवारीला मुलाखती अमरावती, दि. 26 (जिमाका):  भारतीय डाक विभागाच्या अमरावती विभ...