Saturday, August 6, 2022

महाडिबीटी प्रणालीवरुन नवीन व नुतनीकरणाचे अर्ज भरण्यास 25 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

 महाडिबीटी प्रणालीवरुन नवीन व नुतनीकरणाचे

अर्ज भरण्यास 25 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

अमरावती, दि.06 :  महाडिबीटी पोर्टलवर सन 2021-22 वर्षातील वि.जा.भ.ज., इ.मा.व. व वि.मा.प्र. प्रवर्गासाठी नवीन अर्ज व नुतनीकरणाचे अर्ज भरण्यासाठी गुरुवार, दिनांक 25 ऑगस्ट 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच सन 2020-21 साठी अर्ज रिअप्लाय करण्यासाठी ही 25 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यानुसार विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त माया केदार यांनी केले आहे.

            सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व इतर मागास बहुजन विभागांतर्गत अनुजाती, वि.जा.भ.ज., इ.मा.व. व वि.मा.प्र. प्रवर्गातील महाडिबीटी प्रणालीवर भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, मॅट्रीकोत्तर शिक्षण फी, परीक्षा फी प्रदाने, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक पाठ्यक्रमांशी संलग्न असलेल्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना विद्यावेतन तसेच व्यवसाय प्रशिक्षण शुल्क प्रतिपूर्ती योजना राबविण्यात येतात. मुदतवाढीला अनुसरुन जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी या योजनांसाठी नवीन व नुतनीकरणाचे आवेदनपत्र विद्यार्थ्यांकडून भरुन घ्यावेत. ज्या विद्यार्थ्यांच्या अर्जात त्रुटी होत्या, त्यांचे अर्ज महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या लॉगइनला पाठविले आहेत. विद्यार्थीस्तरावर प्रलंबित असलेल्या अर्जाची त्रुटी पूर्तता करुन परिपूर्ण अर्ज जिल्हा कार्यालयाकडे पाठविण्यात यावेत. विहित मुदतीत महाविद्यालयांनी अर्ज भरुन घ्यावेत. पात्र मागासवर्गीय विद्यार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना अवगत  करण्याबाबत समाज कल्याण विभागामार्फत पत्रकाव्दारे कळविण्यात आले आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 10.06.2026

  शुक्रवारी जागतिक बाल कामगार प्रथाविरोधी दिन अमरावती, दि. 10 (जिमाका) : बालमजुरी या अनिष्ठ प्रथेविरूद्ध विस्तृत प्रमाणात जनजागृती करणे आवश्...