Monday, April 22, 2024

हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन (सौ. प्रणिता योगेश शेंडे)

 


हरविलेल्या व्यक्तीबाबत आवाहन (सौ. प्रणिता योगेश शेंडे)

          अमरावती, दि. 22 (जिमाका) :  येथील  सौ. प्रणिता योगेश शेंडे  (वय 24 वर्षे, नांदगाव पेठ, अमरावती) ही व्यक्ती हरविल्याची फिर्याद नांदगाव पेठ, पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. सौ. प्रणिता शेंडे हे दि. 18 एप्रिल, 2024 रोजी मुलगा नित्यम योगेश शेंडे याला सोबत घेऊन निघून गेली.  शोध घेतला असता ती सापडली नाहीत. तीचा बांधा सडसातळ, रंग सावळा, उंची 4 फुट 9 इंच, नाक चपटे मोठे, घरुन जातेवेळी अंगात लाल रंगाचा सलवार सुट, उजव्या हातावर योगेश नाव गोंदलेले आहे. तसेच 2 वर्षाचा मुलगा नित्यम याने अंगात पिवळ्या रंगाचा शर्ट व हाफ पँन्ट घातलेला होता. या वर्णनाची व्यक्ती कुणाला आढळल्यास त्यांनी नांदगाव पेठ पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन नांदगाव पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी केले आहे.

                                                                      00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 17-10-2025

                                                        जिल्हा महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी अमरावती, दि. 17 (जिमाका) : जिल्हा महिला लोकश...