Tuesday, June 10, 2025

DIO NEWS AMRAVATI 07.06.2025

 जिल्हाधिकाऱ्यांची धारणी तालुक्याला भेट

 

अमरावती, दि. ७ (जिमाका) :  जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी नुकतीच धारणी तालुक्यातील प्रकल्प अधिकारी कार्यालयामध्ये आदिवासी विकास विभागाची आढावा बैठक घेतली.

  धारणी तहसील कार्यालय येथे भेट देवून नैसर्गिक आपत्तीबाधित शेतकर्‍यांच्या इ - केवायसीबाबत तसेच ॲग्रीस्टॅक रजिस्ट्रेशनविषयी प्रक्रियेची पाहणी केली. याबाबत संबंधितांना सूचना दिल्या.

  त्यानंतर धारणी उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे आशासेविकांसोबत संवाद साधला.  उत्कृष्ट काम करणार्‍या आशासेविकांचा सत्कार केला, तसेच त्यांच्या दैनंदिन कामकाजातील अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या.  उपविभागीय धारणी कार्यालय येथे भेट देऊन तेथील अत्याधुनिक ब्लड बँकची पाहणी केली. तसेच कुपोषित बालकांच्या कुटुंबीय व डॉक्टरांसोबत चर्चा केली. त्यांचे औषधोपचार व आहाराविषयी मार्गदर्शन केले. 

  पर्यावरण दिनानिमित्त नवीन प्रशासकीय इमारत येथील वन विभागाच्या परिसरात जिल्हाधिकारी श्री. येरेकर यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.

***

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार