गॅस गळती रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे 'मॉकड्रिल'; रंगीत तालीम संपन्न
अमरावती, दि. 22 (जिमाका) : कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनामार्फत आज लोणी येथील अदानी टोटल गॅस सीएनजी (भागवत पंप) केंद्रावर 'सुरक्षा लेव्हल-३ मॉकड्रिल'चे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही रंगीत तालीम पार पडली.
या मॉकड्रिलमध्ये गॅस गळतीसारखी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्यास घ्यावयाची खबरदारी, सायरन वाजवून धोक्याची सूचना देणे, प्रमाणित कार्यपद्धतीचा अवलंब करणे आणि बाधितांना त्वरित प्रथमोपचार देऊन सुरक्षितस्थळी हलवणे या बाबींचे प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात आले. अदानी टोटल गॅसच्या तांत्रिक पथकाने या वेळी आपत्कालीन नियोजनाचे बारकावे समजावून सांगितले.
या मोहिमेत महसूल विभाग, नांदगाव खंडेश्वरचे तहसीलदार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी आणि जिल्हा शोध व बचाव पथकाचे जवान सहभागी झाले होते. तसेच अमरावती अग्निशमन विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालयाची रुग्णवाहिका यंत्रणा आणि लोणी पोलीस स्टेशनचे अधिकारी-कर्मचारी यांनी समन्वयाने काम केले. या प्रसंगी आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ, अदानी गॅसचे संचालक व व्यवस्थापक, आपदा मित्र, आपदा सखी, लोणीचे सरपंच, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा उपक्रमांमुळे आपत्तीच्या काळात जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी यंत्रणांमधील समन्वय अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.
00000
जिल्ह्यातील पर्यटनाला मिळणार 'होमस्टे'ची जोड; स्थानिकांना रोजगाराची संधी
अमरावती, दि. 22 (जिमाका): महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील पर्यटनाला नवी चालना देण्यासाठी 'होमस्टे' योजना आता अधिक प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या योजनेमुळे पर्यटकांना जिल्ह्याची संस्कृती जवळून अनुभवता येईल, तर स्थानिक नागरिकांना आपल्या घराच्या माध्यमातून उत्पन्नाचे साधन मिळेल, अशी माहिती पर्यटन संचालनालयाचे विभागीय उपसंचालक विजय जाधव यांनी दिली आहे.
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे स्थानिक नागरिक त्यांच्या घरातील उपलब्ध खोल्या पर्यटकांच्या निवासासाठी अधिकृतपणे देऊ शकतील. यामुळे पर्यटकांना हॉटेलऐवजी स्थानिक परंपरा, खाद्यसंस्कृती आणि ग्रामीण जीवनशैलीचा अस्सल अनुभव घेता येईल. या उपक्रमाचा मोठा लाभ विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागातील जनतेला होणार असून, त्यातून शाश्वत पर्यटन आणि स्थानिक रोजगार निर्मितीला बळ मिळणार आहे.
जिल्ह्यातील इच्छुक घरमालकांनी शासनाने निर्धारित केलेले निकष पूर्ण करून आपली नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीकृत होमस्टेंना पर्यटन विभागामार्फत तांत्रिक मार्गदर्शन, प्रसिद्धी आणि विविध शासकीय योजनांचे लाभ प्राधान्याने दिले जातील. अमरावती विभागातील हॉटेल व्यावसायिक आणि नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घेऊन स्वयंपूर्ण व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या योजनेच्या अधिक माहितीसाठी किंवा नोंदणी प्रक्रियेसाठी इच्छुकांनी कमलेश नंदनवार (मो. क्र. ८९७५८४८९८७) किंवा श्रीमती उज्ज्वला काळे (मो. क्र. ८३७९०५८०६०) यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.
000000
शहर वाहतुकीत तात्पुरता बदल
पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे पोलीसांचे आवाहन
अमरावती, दि. 22 (जिमाका) : वेलकम टी पॉइंट ते कांता नगर मार्गावर (पाथवे- हॅपी स्ट्रीटवर) मॉनिंग वॉक करणाऱ्या नागरिकांसाठी सकाळी वेलकम टी पॉइंट ते बियाणी चौक मार्गावरील वाहतुक बंद ठेवण्यात येत असल्याची माहिती अमरावती शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांनी दिली आहे.
हे मार्ग बंद असतील
वेलकम टी पॉइंट कडून बियाणी चौकाकडे येणार एकतर्फी मार्ग कालावधी रविवार दि. 28 डिसेंबर 2025 या तारखेस सकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत बंद राहील.
हे असतील पर्यायी मार्ग
वेलकम टी पॅाईंट व पंचवटी चौकापासून कांता नगर चौक किंवा प्रादेशिक परिवहन कार्यालय मार्ग हे पर्यायी मार्ग असतील. वरील वाहतुक नियमन रूग्ण्वाहिका, अग्नीशामक वाहन, कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना लागू राहणार नाही. वाहतुक परिस्थितीनुसार वाहतुक थांबविणे व वळविणे याबाबत सर्व अधिकार वाहतुक विभागास राहील. तसेच अत्यावश्यक वेळी जनहित लक्षात घेता पोलीस उपायुक्त वाहतुक यांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून नियोजित अधिसूचनेमध्ये वाहतुकीच्या नियमनाबाबत अंशत: बदल करता येतील.
00000
बांधकाम क्षेत्रातील तरुणांना इस्रायलमध्ये नोकरीची संधी;
पात्र उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन
अमरावती, दि. 22 (जिमाका): आंतरराष्ट्रीय स्तरावर नोकरीच्या शोधात असलेल्या सुशिक्षित तरुणांसाठी इस्रायल देशामध्ये रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती आणि एनएसडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने इस्रायलमधील 'रिनोवेशन कन्स्ट्रक्शन' क्षेत्रात एकूण 2600 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या संधीचा जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती प्रांजली बारस्कर यांनी केले आहे.
या भरती प्रक्रियेअंतर्गत विविध तांत्रिक कामांसाठी पदसंख्या उपलब्ध आहे. यामध्ये प्रामुख्याने प्लास्टरिंग वर्क (हजार जागा), सिरेमिक टायलिंग (हजार जागा), ड्रायवॉल वर्कर (300 जागा) आणि मेसन (300 जागा) यांचा समावेश आहे. बांधकाम क्षेत्रातील अनुभव असलेल्या उमेदवारांसाठी परदेशात काम करण्याची ही उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी या रोजगाराच्या संधीचा लाभ
घेण्यासाठी maharestransinterna
२५६६०६६ किंवा amravatirojgar@
00000
अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून कर्ज प्रक्रियेबाबत खुलासा;
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
अमरावती, दि. 22 (जिमाका): अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कार्यवाहीबद्दल समाजमाध्यमांवरून चुकीची व दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर, महामंडळाने अधिकृत खुलासा प्रसिद्ध करून वस्तुस्थिती स्पष्ट केली असून मराठा समाजातील तरुण आणि नागरिकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
या आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी केवळ निवडणुका प्रलंबित असलेल्या हद्दीमध्येच नवीन पात्रता प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली आहे. मात्र, या क्षेत्रांव्यतिरिक्त उर्वरित संपूर्ण राज्यामध्ये पात्रता प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया नियमितपणे सुरू आहे. आचारसंहितेचा कालावधी संपल्यानंतर संबंधित क्षेत्रांमधील ही प्रक्रिया पुन्हा नियमानुसार पूर्ववत सुरू करण्यात येईल.
महामंडळाने पुढे स्पष्ट केले की, महामंडळाविषयी प्रसारित होत असलेल्या मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून समाजमाध्यमांवरील दिशाभूल करणाऱ्या माहितीमुळे संभ्रम निर्माण होऊ नये, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.
000000
.jpeg)
.jpeg)
No comments:
Post a Comment