Tuesday, October 4, 2016

21 वर्षाची सोनु विनायकराव कावलकर बेपत्ता
          अमरावती, दि.23 (जिमाका): पोलिस आयुक्तालय अमरावती, शहर पोलिस ठाणे फ्रेजरपुरा हद्दीतील कु. सोनु विनायकराव कावलकर ही राहणार पिंपरी निपानी ता. नांदगांव खंडेश्वर, जि.अमरावती (हल्ली मुक्काम-तांत्रीक कॉलनी, अमरावती) दि.19 ऑगस्ट, 16 पासुन बेपत्ता आहे. फिर्यादी बेपत्ता मुलीचे पिता विनायक मो. कावलकर यांनी दिलेल्या माहिती नुसार सोनू ही नेहमी प्रमाणे घराला कुलुप लावुन युवा शक्ती कॉलेज येथे सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यत गेली होती. फिर्यादी हे गावावरुन परत आल्यावर त्यांना घरी कुलुप लागलेले दिसले. त्यांनी आपल्या मुलीची वाट पाहिली, परंतु ती घरी परत आली नाही. तिचा आजुबाजुला व नातेवाईकांकडे शोध घेतला, तरीपण ती मिळुन आली नाही. पोलिस ठाणे फ्रेजरपुरा येथे दि.19 ऑगस्ट, 16 रोजी मिसींग रजिस्टर क्र. 92/2016 प्रमाणे बेपत्ता असल्याची नोंद घेण्यात आली आहे. अद्यापर्यंत तिचा शोध लागला नाही, असे सहा.पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा, अमरावती शहर यांनी कळविले आहे.
          बेपत्ता कु. सोनु विनायकराव कावलकर ही 21 वर्षाची असुन तिची उंची 5 फुट 2 इंच आहे. तिचा रंग सावळा, बांधा सडपातळ, अंगात सलवार कुर्ता घातलेला आहे. टी.व्ही.एस वेगो क्र. एम.एच.27-ए. डब्ल्यु. 9897 गाडी सोबत घेऊन गेली आहे.  ज्या कोणाला ह्या मुलीबाबत काही माहिती सांगावयाचे असल्यास किंवा शोध लागला तर पोलिस स्टेशन फ्रेजरपुरा येथे 0721-2552600 या क्रमांकावर किंवा नियंत्रण कक्ष अमरावती शहर येथे 0721-2551000 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन गुन्हे शाखा, अमरावती शहराचे सहायक पोलीस आयुक्त यांनी केले आहे.

                                                          00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार