Tuesday, October 4, 2016

राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील दि.26 व 27 सप्टेंबर रोजी 
अमरावती जिल्हा दौऱ्यावर
          अमरावती, दि.26 (जिमाका): गृह (शहरे), नगरविकास, सामान्य प्रशासन, नगरविकास, बंदरे, विधी व न्याय, संसदिय कार्य, माजी सैनिकांचे कल्याण, कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील दि.26 व 27 सप्टेंबर, 16 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत असुन दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          दि.26 सप्टेंबर, 16 रोजी सोयीनुसार बुलडाणा येथून मोटारीने अमरावती कडे प्रयाण. अमरावती येथे आगमन व शासकीय विश्रामगृह, अमरावती येथे मुक्काम. दि. 27 सप्टेंबर 16 रोजी दिवसभर अमरावती येथील विविध स्थानिक कार्यक्रमांस उपस्थिती. सायं 7.05 वा. अमरावती येथून अमरावती एक्सप्रेसने मुंबई कडे प्रयाण.
00000
वृत्त क्र.988                                                                         दिनांक 26-09-2016
राज्यमंत्री दादाजी भुसे दि.28 सप्टेंबर रोजी 
अमरावती जिल्हा दौऱ्यावर
          अमरावती, दि.26 (जिमाका): ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे दि.28 सप्टेंबर, 16 रोजी अमरावती जिल्हा दौऱ्यावर येत असुन दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          दि.28 सप्टेंबर, 16 रोजी दुपारी 12.30 वाजता नागपुर येथून अमरावतीकडे प्रयाण. दुपारी 2 वा. शासकीय विश्रामगृह अमरावती येथे आगमन, दुपारी 3 वा. ते सायं. 5 वाजेपर्यत विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान पुर्वतयारी बैठकीस उपस्थिती. सायं. 5.30वा. संत गाडगे बाबा समाधीस्थळ, अमरावती येथे भेट. सायं. 6.30 वा. नागरवाडी, ता. चांदुरबाजार, जिल्हा अमरावतीकडे, प्रयाण. रात्री 7.30 वा. नागरवाडी येथे आगमन. रात्री 8.30वा. बडनेरा कडे प्रयाण.

00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार