Tuesday, October 31, 2017

एकता दौड’मध्ये विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग

अमरावती, दि. 31 : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे आज एकता दौड काढण्यात आली. शहरांतील विविध शाळा- महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी त्यात सहभाग घेतला.
विभागीय क्रीडा संकुल येथे प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर राज्य क्रीडा मार्गदर्शक डॉ. सतीश पहाडे यांनी हिरवी झेंडी दाखवून दौडचा शुभारंभ केला. क्रीडा अधिकारी रमेश बुंदिले, पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, स्काऊट गाईडच्या जिल्हा संघटक वैशाली घोम यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी या उपक्रमात सहभाग घेतला.  
00000

No comments:

Post a Comment

#अमरावती_विभाग_शिक्षक_मतदारसंघ_निवडणूक_2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या अंतीम मतदानाची आकडेवारी

  # अमरावती _ विभाग _ शिक्षक _ मतदारसंघ _ निवडणूक _2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या...