Wednesday, November 22, 2017

मुदत संपणा-या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
अमरावती दि.22 : जिल्ह्यातील जानेवारी- फेब्रुवारी 2018 मध्ये मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित ग्रामपंचायतीच्या  निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. तसे पत्र  उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी तहसीलदारांना पाठवले आहे.
            जिल्ह्यातील चांदूर रेल्वे, मोर्शी, अंजनगाव सुर्जी, अचलपूर व धारणी या तालुक्यातील एकूण 13 ग्रामपंचायतीचा या निवडणुकीत समावेश आहे.
            निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे : तहसीलदार 24 नोव्हेंबरला निवडणूक नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे मागविण्याचा व सादर करण्याचा कालावधी 5 ते 11 डिसेंबर 2017 असा आहे. नामनिर्देशनपत्रांची छाननी 12 डिसेंबरला होईल. नामनिर्देशन 14 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत मागे घेता येईल. त्यानंतर याचदिवशी दुपारी तीननंतर उमेदवारांची यादी व चिन्हे जाहीर करण्यात येतील.  आवश्यक असल्यास 26 डिसेंबरला मतदान होईल. 27 डिसेंबरला मतमोजणी होईल. निवडणुकीचा निकाल 28 ते 30 डिसेंबरदरम्यान जाहीर होईल.
00000

No comments:

Post a Comment

अमरावती येथे मंगळवारी होणार मतमोजणी मतमोजणी केंद्रात १७५ अधिकारी, कर्मचारी नियुक्त; पोलीस बंदोबस्तही चोख

  #अमरावती_विभाग_शिक्षक_मतदारसंघ_निवडणूक_2026 अमरावती येथे मंगळवारी होणार मतमोजणी मतमोजणी केंद्रात १७५ अधिकारी, कर्मचारी नियुक्त; पोलीस बंदो...