Tuesday, November 13, 2018

सामाजिक न्याय मंत्र्यांचा नागरिकांशी गुरुवारी ई- लाईव्ह संवाद


अमरावती, दि. 13 : सामाजिक न्याय विभागातर्फे गत चार वर्षांत राबविण्यात आलेले महत्वपूर्ण निर्णय व योजनांबाबत सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले हे दि. 15 नोव्हेंबरला सकाळी 11. 30 वाजता राज्यातील नागरिकांशी, विद्यार्थ्यांशी व सामाजिक न्याय विभागातील कार्यरत सर्व कर्मचा-यांसमवेत ई- लाईव्ह संवाद साधणार आहेत.
या कार्यक्रमाचे प्रक्षेपण http://elearning.parthinfotech.in या लिंकद्वारे प्रसारित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात प्रश्न विचारू इच्छिणा-या व्यक्तींनी 8384858685 या मोबाईल क्रमांकावर व्हाटसॲपद्वारे प्रश्न विचारावेत. हे प्रक्षेपण लाईव्ह व्हिडीओ, स्मार्ट फोन्स, टॅबलेटवर पाहता येईल. कार्यक्रमात सहभागाचे आवाहन सहायक समाजकल्याण आयुक्त मंगला मून यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

टास्क फोर्स् सदस्य जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे विद्यार्थी,उमेदवार व संबंधित घटकांशी थेट संवाद साधणार

  भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येणार आह...