Thursday, April 2, 2020

हरभरा खरेदीसाठी नोंदणी प्रक्रीयेच्या कालावधीत वाढ - पालकमंत्री यशोमती ठाकुर



       अमरावती, दि. 2 : किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमी भावाने हरभरा खरेदीसाठी दि. 1 मार्च पासून शेतकऱ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया दि. 30 एप्रिल 2020 पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री यशोमती ठाकुर यांनी दिली.  
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी दि.23 मार्चच्या मध्यरात्रीपासून दि.14 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे.  तसेच राज्यात  कलम 144 नुसार दि.22 मार्च पासून संचारबंदी देखील लागू करण्यात आली आहे. त्यामुळे हरभरा नोंदणीसाठी अडचणी आहेत. ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यात आली. त्यानुसार शेतकरी 30 एप्रिल 2020 पर्यंत नोदणी करू शकतील, असे पणन विभागातर्फे कळविण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधव हमी भावाच्या खरेदी पासून वंचित राहु नये यासाठी हरभरा खरेदीकरीता नोंदणी कालावधी 30 दिवसाने वाढविण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
00000


No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार