Thursday, April 2, 2020

पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर यांच्याकडून तिवसा ग्रामीण रुग्णालयाची पाहणी











        अमरावती, दि. 02 : कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री ॲड यशोमती ठाकूर यांनी आज तिवसा ग्रामीण रुग्णालयाची पाहणी केली.
            पालकमंत्री ॲड श्रीमती ठाकूर यांनी आज तिवसा येथे भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी ग्रामीण रुग्णालयामध्ये उपलब्ध असलेल्या सोयी सुविधांची पाहणी केली. तिवसा ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक पवन मालुसरे यांच्याशी चर्चा करुन त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.  

            रुग्णालयात क्वारंटाईन कक्षासह इतर आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवण्यात आली आहे. वैद्यकीय पथके वेळोवेळी आवश्यक त्या तपासण्या करत आहे. आवश्यक प्रशिक्षण, डॉक्टर, पारिचारिका व इतर कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. त्या साधन सामुग्री उपलब्ध करुन घ्यावी. नागरीकांनी घराबाहेर पडू नये यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात नागरीकांपर्यंत दक्षतेबाबतची माहिती विविध माध्यमांतून पोहचवावी. बाहेरुन आलेल्या नागरीकांमध्ये लक्षणे आढळत नसली तरी त्यांना होम क्वारंटाईन करण्यात येत आहे. अशा नागरीकांशी पथकांद्वारे वेळोवेळी संपर्क साधून परिस्थितीवर लक्ष ठेवावे. कुठलिही अडचण आल्यास तत्काळ संपर्क साधावा असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.  
            नगराध्यक्ष वैभव वानखडे,उपसभापती शरद वानखडे, नगरसेवक दिवाकर भुरभुरे,संध्या पखाले,हिमानी भोसले,शिवा तिखाडे,रवींद्र हांडे, संदीप आमले, लोकेश केणे, तहसीलदार वैभव फरतारे,मुख्याधिकारी पल्लवी सोटे,पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर उपस्थित होते
00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार