Tuesday, April 14, 2020

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पालकमंत्र्यांकडून अभिवादन

  
अमरावती, दि. 14 : भारतीय संविधानाचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. 
पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कु. आकांक्षा ठाकूर यांनीही यावेळी अभिवादन केले. 
यानिमित्त पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी जिल्ह्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या की,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या मूल्यांचा अखंडपणे पुरस्कार केला. शोषित, वंचित घटकांना न्याय मिळवून देत त्यांनी समाजाच्या व देशाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले आयुष्य वाहिले. कष्टकरी, कामगारांचे हक्क, महिलांचे सक्षमीकरण, शिक्षण, कृषी-सिंचन अशा कितीतरी क्षेत्रात त्यांचे अतुलनीय कार्य आहे. आजच्या काळात देशाला एकसंध ठेवण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार अंगीकारणे आवश्यक आहे

No comments:

Post a Comment

भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येथे येणार.

  भरती परीक्षा अधिक सुरक्षित,पारदर्शक,विश्वासार्ह व उमेदवाराभिमुख करण्यासाठी गठीत उच्चस्तरीय टास्क फोर्स १७ सप्टेंबर रोजी #अमरावती येथे येणा...