Monday, April 6, 2020

पाच वर्षांच्या चिमुकलीची मुख्यमंत्री सहायता निधीला मदत



अमरावती, दि. 6 : येथील रूधिरा जितेंद्र दखने या पाच वर्षांच्या चिमुकलीने गत दोन वर्षांत आपल्या पिगी बँकेत जमा झालेली रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला दिली आहे. चिमुकलीच्या या संवेदनशीलतेचे समाजातील विविध मान्यवरांकडून कौतुक होत आहे.
रूधिरा ही अमरावतीच्या होलिक्रॉस शाळेची केजी वनची विद्यार्थिनी आहे. वाढदिवस किंवा इतर विविध कार्यक्रमांत तिला पाहुण्यांकडून खाऊ म्हणून मिळालेली रक्कम ती दोन वर्षांपासून आपल्या पिगी बँकेत साठवून ठेवत होती.  सध्या कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधासाठी शासनाकडून मदतीचे आवाहन केले असताना रूधिरानेही आपल्या खाऊची 2 वर्षांत जमा झालेली तीन हजार रूपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीला देण्याचा निश्चय केला. त्यानुसार तिचे वडील पत्रकार जितेंद्र दखने यांनी  हा निधी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्या सुपुर्द केला.
चिमुकलीच्या या संवेदनशीलतेबद्दल पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून कौतुक होत आहे. 

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 10.06.2026

  शुक्रवारी जागतिक बाल कामगार प्रथाविरोधी दिन अमरावती, दि. 10 (जिमाका) : बालमजुरी या अनिष्ठ प्रथेविरूद्ध विस्तृत प्रमाणात जनजागृती करणे आवश्...