Friday, January 14, 2022

जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकूण लसीकरण 30 लाखांवर

 


जिल्ह्यात अद्यापपर्यंत एकूण लसीकरण 30 लाखांवर

अमरावती, दि. 14 : कोविड प्रतिबंधक लसीकरणासाठी विशेष मोहिम व त्यानंतरचे सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे एकूण लसीकरणाचा टक्का वाढला आहे. दि. 13 जानेवारीपर्यंत जिल्ह्यात 30 लाख 39 हजार 571 एवढे एकूण लसीकरण झाले.

दरम्यान, 15 ते 18 वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण, तसेच ज्येष्ठ व सहव्याधी असलेल्या व्यक्ती आणि फ्रंटलाईन वर्कर्सचे बूस्टर लसीकरणही गतीने पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत.  

उपविभागीय व तालुका यंत्रणा व आरोग्य यंत्रणेकडूनही याबाबत सातत्याने पाठपुरावा होत आहे.  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनीही  जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिका-यांची बैठक घेऊन लसीकरण, विद्यार्थी व फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण, आरटीपीसीआर तपासण्या आदींचा आढावा घेतला. 

No comments:

Post a Comment

#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६

  #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #अहिल्यादेवीहोळकर #कर्जमुक्तीयोजना2026 #FarmerWelfare #...