Tuesday, January 25, 2022

वलगाव येथील स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करा पालकमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश


 

वलगाव येथील स्मशानभूमीच्या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण करा

पालकमंत्र्यांचे प्रशासनाला आदेश

 

अमरावती, दि. 25 : वलगाव विकास आराखड्यात अनेक कामे अंतर्भूत आहेत. तथापि, वलगाव येथील स्मशानभूमी परिसराचा विकास तत्काळ होणे आवश्यक आहे. त्यामुळे तेथील संरक्षण भिंतीचे काम प्राधान्याने पूर्ण करावे, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी नुकतेच दिले.

 

वलगाव येथील विकासकामांचा आढावा पालकमंत्र्यांनी नुकताच घेतला. नियोजन उपायुक्त किरण जोशी, वलगाव विकास आराखड्याचे विशेष कार्य अधिकारी हर्षद चौधरी आदी उपस्थित होते.

 

वलगाव येथे स्मशानभूमी परिसरातील विकासकाम वेगाने पूर्ण होणे आवश्यक आहे. नदीजवळ असल्याने स्मशानभूमी स्थळाला संरक्षक भिंत असणे आवश्यक आहे. नागरिकांची मागणी पाहता हे काम तत्काळ पूर्ण व्हावे. सध्या उपलब्ध निधीतून काम पूर्ण करावे. याबाबतचे अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभागाने सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. विकासकामांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाहीही पालकमंत्र्यांनी दिली.

 

00000

 

No comments:

Post a Comment

#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६

  #पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #अहिल्यादेवीहोळकर #कर्जमुक्तीयोजना2026 #FarmerWelfare #...