Wednesday, March 30, 2022

दुचाकी वाहनधारकांनी हेल्मेट वापरण्याचे आवाहन

 दुचाकी वाहनधारकांनी हेल्मेट वापरण्याचे आवाहन

 

        अमरावती, दि.30: दुचाकी वाहन चालवितांना हेल्मेटचा वापर करणे हे रस्ता सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. शासकीय कार्यालयामध्ये कामानिमित्त येणारे बहुतांशी नागरिक तसेच कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे दुचाकी वाहन चालविताना हेल्मेट वापरण्याचे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाव्दारे करण्यात आले आहे. आर टी ओ कार्यालयाकडून हेल्मेट वापरासंबंधी मोहिम राबविण्यात येत आहे.  बहुतांशी दुचाकी वाहनांच्या अपघातांमध्ये जखमी होणारे अथवा मृत पावणारे वाहनस्वार हे हेल्मेटशिवाय प्रवास करणारे असतात. प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या मोहिमेतंर्गत हेल्मेट वापर करण्याबाबत नागरिक, जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, शैक्षणिक व इतर संस्थेतील अधिकारी, कर्मचारी  यांना हेल्मेट वापरण्यासंबंधी प्रबोधन करण्यात येत आहे. तसेच हेल्मेट न वापरणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कार्यवाही करण्यात येणार आहे.

 

            सर्व दुचाकी वाहनधारकांनी हेल्मेट वापरावे. तसेच शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी स्वत: हेल्मेट वापरुन  कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना हेल्मेट वापरासंबंधी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी पत्रकाव्दारे केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार