Wednesday, April 13, 2022

राष्ट्रीय शिकावू उमेदवारी भरती मेळावा 21 एप्रिलला

 राष्ट्रीय शिकावू उमेदवारी भरती मेळावा 21 एप्रिलला

·       बेराजगारांना रोजगाराची संधी

अमरावती, दि.13 : राष्ट्रीय शिकावू उमेदवार भरती मेळावा गुरुवार, दिनांक 21 एप्रिल 2022 रोजी मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्र, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एन.एन. एस. हॉल, अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे.  या भरती मेळाव्यास अमरावतीसह नागपूर, पुणे, औरंगाबाद येथील नामांकित कंपनी तसेच त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. यासाठी जिल्ह्यातील सर्व व्यवसायातील अंतिम वर्षात प्रशिक्षण घेत असलेल्या व आयटीआय उत्तीर्ण झालेल्या इच्छुक प्रशिक्षणार्थींनी स्वत:ची वैयक्तिक माहिती तसेच आवश्यक मुळ कागदपत्रांसह भरती मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन  मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सूचना केंद्राचे सहायक प्रशिक्षणार्थी सल्लगार यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.

                                           00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 17-10-2025

                                                        जिल्हा महिला लोकशाही दिन येत्या सोमवारी अमरावती, दि. 17 (जिमाका) : जिल्हा महिला लोकश...