Saturday, April 9, 2022

कृषी योजनांचा लाभ शेतकरी बांधवांना मिळण्यासाठी गावोगावी शिबिरे घ्यावीत - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 










वरखेड येथे रिचार्ज ट्रेंच व रिचार्ज शाफ्ट बांधकामाचे भूमीपूजन

 कृषी योजनांचा लाभ शेतकरी बांधवांना मिळण्यासाठी गावोगावी शिबिरे घ्यावीत

- पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. ९ : शासनाने कृषी विभागाकडून अनेक चांगल्या योजना अमलात आणल्या आहेत. त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या योजना खेडोपाडी पोहोचणे आवश्यक आहे.कृषी योजनांच्या लाभ अधिकाधिक शेतकरी बांधवांना मिळवून देण्यासाठी गावोगावी शिबीरे घेण्याचे निर्देश पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज वरखेड येथे दिले.

तिवसा तालुक्यातील वरखेड येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प योजनेत रिचार्ज ट्रेंच व रिचार्ज शाफ्ट बांधकामाचे भूमीपूजन आज पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. सुमारे ५४ लक्ष रुपये निधीतून हे काम पूर्णत्वास जाणार आहे. कृषी यांत्रिकीकरण योजनेत ट्रॅक्टरचे वितरणही यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

पोकरा योजना जिल्ह्यातील ५३२ गावांत राबवली जाते. या योजनेत वैयक्तिक लाभाच्या अनेक उत्तम योजना आहेत. ठिबक, तुषार संचाप्रमाणेच शेडनेट हाऊस, पॉलिग्रीनहाऊससारख्या चांगले अनुदान असलेल्या योजनांचाही लाभ शेतकरी बांधवांना मिळाला पाहिजे. त्यासाठी या उपक्रमाची भरीव प्रसिद्धी गावोगाव करावी. प्रत्येक ठिकाणी  शिबिरे घेऊन शेतकरी बांधवांना वैयक्तिक योजनांचाही लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

          तिवसा तालुक्यात रिचार्ज शाफ्ट व ट्रेंच आदी अनेक जलसंधारणाची कामे नियोजित आहेत. ती लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न होत आहे, असे श्री. कांबळे यांनी सांगितले.

 

 

 

यावेळी तहसीलदार वैभव फरतारे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी अनिल खर्चान, माजी जि. प. सभापती पूजा आमले, शिल्पा हांडे, गटविकास अधिकारी चेतन जाधव, सेतुभाऊ देशमुख,डॉ. अंजली ठाकरे, तालुका कृषी अधिकारी अनिल कांबळे, भूजल सर्वेक्षण वरिष्ठ भूवैज्ञानिक हिमा जोशी आदी उपस्थित होते.

00000

 

 

 

 

 

No comments:

Post a Comment

रेवसा गावात 'लोकसंवाद';

  रेवसा गावात 'लोकसंवाद'; पथनाट्यातून सावकारीविरोधात जनजागृती   कर्जमुक्ती योजनेसह कृषी विभागाच्या योजनांचाही संदेश