Monday, February 20, 2023

शहरात कलम 37 (3) लागू

 शहरात  कलम 37 (3) लागू

 

       अमरावती, दि. 20 :  शहरात शांतता व सुव्यावस्थाी अबाधित राहावी, यासाठी दिनांक 21 फेब्रुवारी ते 7 मार्च 2023 या कालावधीत महाराष्ट्र पोलिस कायद्याचे  कलम 37 (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे.

      उद्या (मंगळवार), दि. 21 फेब्रुवारी ते 25 मार्चपर्यंत माध्यमिक व उच्च माध्यमिक 12 वी, 10 वी शालांत प्रमाणपत्र परीक्षा होणार असल्याने असामाजिक तत्त्वांकडून परीक्षा केंद्रावर शांतता भंग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच दि.6 मार्च रोजी होळी उत्सव व दि. 7 मार्च रोजी धुलीवंदन उत्सव साजरा करण्यात येत असल्याने कायदा व सुव्यवथेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

तरी वरील बाबी लक्षात घेता जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्थेची परीस्थिती अबाधित राहावी, यासाठी पोलीस आयुक्तालय परिक्षेत्र वगळून अमरावती जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) प्रमाणे प्रतिबंधक आदेश दि. 21 फेब्रुवारी ते 7 मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील. 

        हा आदेश शासकीय, निम शासकीय कर्मचारी, लग्न, नाटक, अत्यंयात्रा, धार्मिक, शासकीय कार्यक्रम, आठवडी बाजार यांना लागू होणार नाही. अत्यंयात्रेव्यतिरिक्त कोणत्याही मिरवणूकीसाठी पोलिस ठाणे अधिकारी यांची लेखी परवानगी आवश्यक राहील. वरील प्रतिबंधात्मक आदेश शहरातील सार्वजनिक सुरक्षिततेसाठी संपूर्ण अमरावती पोलिस आयुक्तयालयाच्या परिक्षेत्रात लागू करण्यात येणार आहे. या कलमांचा भंग करणाऱ्या व्य क्ती्विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यारत येईल, असे अपर जिल्हादंडाधिकारी विवेक घोडके यांनी कळविले आहे.

000000

No comments:

Post a Comment

अमरावती येथे मंगळवारी होणार मतमोजणी मतमोजणी केंद्रात १७५ अधिकारी, कर्मचारी नियुक्त; पोलीस बंदोबस्तही चोख

  #अमरावती_विभाग_शिक्षक_मतदारसंघ_निवडणूक_2026 अमरावती येथे मंगळवारी होणार मतमोजणी मतमोजणी केंद्रात १७५ अधिकारी, कर्मचारी नियुक्त; पोलीस बंदो...