Thursday, October 12, 2023

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्शन

 जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्शन

            अमरावती, दि. 11 : जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व मानसोपचार विभागामार्फत जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती येथे मंगळवारी(दि.10) जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी मानसिक आजाराबाबत रुग्णांना तज्ज्ञांव्दारे मार्गदर्शन करण्यात आले.

            जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे,  भिषक वर्ग डॉ. प्रीती मोरे यांच्या उपस्थिती कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमामध्ये मानसोपचार विभाग प्रमुख डॉ. अमोल गुल्हाने यांनी विविध मानसिक आजाराविषयी रूग्ण व रूग्णांचे नातेवाईकांना माहिती दिली. तसेच भावना पुरोहित, ललीता अटाळकर व डॉ. प्रमोद निरवणे यांनी उपस्थित रूग्ण व रूग्णांच्या नातेवाईकांना मानसिक आजाराविषयी काळजी घेण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची प्रस्तावणा सारा उमर व संचालनाची जबाबदारी प्रमोद भक्ते तर आभार प्रदर्शन श्रध्दा हरकंचे यांनी केले. कार्यक्रमास डॉ. पुरूषोत्तम कुकडे, दिपक ठाकरे, सुनिल कळतकर, झामरे ब्रदर्स, नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.

00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार