Friday, December 15, 2023

 

पंचायत समिती पोटनिवडणूक मतदानाकरिता दोन तासाची सवलत;

सार्वजनिक सुट्टी लागू नाही अशा आस्थापनेवरील मजूर कर्मचाऱ्यांना सवलत

 

अमरावती, दि. 15 (जिमाका):  अमरावती जिल्हापरिषद अंर्तगत पंचायत समिती चांदुर रेल्वे निर्वाचक गण क्र.98 सातेफळ येथे पोटनिवडणूक होत आहे. पंचायत समिती चांदुर रेल्वे निर्वाचन गण क्र.98 सातेफळ क्षेत्रातील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा याकरिता निवडणूक कार्यक्रम लागू असलेल्या क्षेत्रात रविवार दि. 17 डिसेंबर रोजी इतर सर्व आस्थापना (ज्यांना सुट्टी लागू होत नाही) त्यांच्या आस्थापनेवरील क्षेत्रातील रहिवासी असलेले अधिकारी,कर्मचारी, मजूर, कामगार यांना मतदान करता येणे शक्य व्हावे.याकरिता कामाच्या तासातून दोन तासाची सवलत देण्याचे आदेश जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी दिले आहेत.

 

पंचायत समिती चांदुर रेल्वे निर्वाचन गण क्र.98-सातेफळ अंर्तगत अंतर्भूत असलेली गावे याप्रमाणे : 1) सातेफळ 2) धनोडी 3) टेंभूर्णी  4) अमदोरी  5) निमला  6) कळमजापुर 7) चांदूर वाडी 8) राजना 9) बागापुर 10) सुपलवाडा 11) सांगूलवाडा 12) ईस्माईलपुर 13) वाई 14) शिरसगाव कोरडे 15) वडगांव भट 16) मांडवा 17) लसनापुर 18) तुळजापुर 19) दिलावरपुर 20) धनापुर या गावांच्या क्षेत्रात निवडणूक होणार आहे.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 10.06.2026

  शुक्रवारी जागतिक बाल कामगार प्रथाविरोधी दिन अमरावती, दि. 10 (जिमाका) : बालमजुरी या अनिष्ठ प्रथेविरूद्ध विस्तृत प्रमाणात जनजागृती करणे आवश्...