Tuesday, December 10, 2024

DIO AMRAVATI NEWS 10.12.2024

 


गुरुवारी डाक अदालतीचे आयोजन

अमरावती, दि. 10 (जिमाका) : भारतीय डाक विभागामार्फत गुरूवार, दि. 12 डिसेंबर रोजी डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. ही डाक अदालत प्रवर अधीक्षक, डाकघर अमरावती विभाग यांच्या कार्यालयामध्ये दुपारी 4 वाजता होणार आहे. 

पोस्टाच्या कामासंबंधी विशेषत: स्पीड पोस्ट, काउंटर सेवा, डाक वस्तू रजिस्टर पार्सल, बचत बँक व मनीऑर्डर अशा तस्सम तक्रारीबाबतचे निराकरण सहा आठवड्याच्या आत झाले नसेल व त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नसेल, अशा तक्रारी विचारात घेऊन डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

डाक अदालतीसाठी सर्व संबंधितांनी आपले अर्ज प्रवर अधीक्षक, डाकघर अमरावती विभाग, अमरावती 444 602 यांच्याकडे सादर करावेत. त्यामध्ये तक्रारीचा सर्व तपशील, तक्रार केल्याची तारीख, ज्या अधिकाऱ्यास मूळ तक्रार पाठविली असेल त्याचे नाव आणि हुद्दा आदी उल्लेख करुन दि. 12 डिसेंबरपर्यंत पाठवावेत, असे प्रवर अधीक्षक डाकघर यांनी कळविले आहे.

00000

ऊर्जा संवर्धन सप्ताह शनिवारपासून साजरा होणार

*विद्यार्थ्यांद्वारे जनजागृती कार्यक्रम

अमरावती, दि. 10 (जिमाका) : राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताह शनिवार, दि. 14 ते 20 डिसेंबर, 2024 दरम्यान राबविण्यात येणार आहे. या सप्ताहात विद्यार्थ्यांमार्फत ऊर्जा संकट व अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापराविषयी जनजागृती करण्यात येणार आहे,

नवीन व नवीकरणीय ऊर्जा, तसेच ऊर्जा बचतीचे महत्त्व वाढत आहे. आज 60 टक्क्यांपेक्षा जास्त ऊर्जा निर्मिती ही औष्णिक ऊर्जा निर्मिती पद्धतीने केली जाते. तथापि पारंपरिक पद्धतीने ऊर्जा निर्मिती करताना पर्यावरणामध्ये ग्रीन हाऊस गॅसेस सोडले जातात. यामध्ये कार्बन, क्लोराईड, नॉयट्रोजन, सल्फेट यांचा समावेश असतो. या वायूचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच जागतिक उष्णतामान वाढत आहे. पारंपरिक ऊर्जा निर्मितीचे स्त्रोत सिमीत आहे. राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन सप्ताहामध्ये शाळा व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमार्फत ऊर्जा संकटाबाबत जनतेमध्ये जनजागृती, तसेच अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांचा वापराविषयी प्रबोधनात्मक संदेश लोकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे, अशी माहिती महाऊर्जाचे विभागीय व्यवस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी दिली.

 

0000

--

No comments:

Post a Comment

#अमरावती_विभाग_शिक्षक_मतदारसंघ_निवडणूक_2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या अंतीम मतदानाची आकडेवारी

  # अमरावती _ विभाग _ शिक्षक _ मतदारसंघ _ निवडणूक _2026 दिनांक 23 ऑक्टोबर, 2026 रोजी सकाळी 08.00 वा. ते दुपारी 16.00 वाजे पर्यंत झालेल्या...