Tuesday, December 3, 2024

DIO NEWS AMRAVATI 03.12.2024


 

कारागृहातील बंद्यांसाठी आध्यात्मिक प्रवचन

अमरावती, दि. 03 (जिमाका) : सकल जैन समाज संस्था आणि श्री महाकाली माता शक्तीपीठ यांच्यातर्फे अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहात आध्यात्मिक प्रवचन सोमवार, दि. 2 डिसेंबर रोजी पार पडले.

अपर पोलीस महासंचालक, कारागृह व सुधारसेवा प्रशांत बुरडे आणि कारागृह उपमहानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा स्वाती साठे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रम घेण्यात आला.

सकल जैन समाज संस्थेचे सचिव अभिनंदन पेंढारी यांनी संस्थेचा अल्प परिचय करुन दिला. विविक्त श्री माताजी यांच्या आध्यात्मिक कार्याविषयी माहिती दिली. विविक्त श्री माताजी यांनी बंद्यांनी आहार, आचरण, विचाराबाबत मार्गदर्शन केले. महाकाली शक्तीपीठाचे शक्तीजी महाराज यांनी कारागृहातून सुटल्यानंतर स्वत:चा रोजगार करुन अनिष्ठ व्यक्ती आणि व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन केले. कारागृह अधीक्षक किर्ती चिंतामणी यांनी आध्यात्मिक विचार आचरणात आणून वाईट प्रवृत्तीपासून दूर राहण्याचे सांगितले. कारागृहातील 270 बंद्यांनी यात सहभाग घेऊन सकारात्मक प्रतिसाद दिला. 

कार्यक्रमाचे आयोजन ललित मुंडे, संजय घोलप यांनी केले. कार्यक्रमासाठी शक्तीजी महाराज यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी तुरुंगाधिकारी शामराव गिते,  कारागृह शिक्षक मिलींद बनसोड, संजय घोलप व ललित मुंडे, सुभेदार गोपाल कचरे, श्रीकृष्ण लांजेवार उपस्थित होते. 

00000

No comments:

Post a Comment

‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

  ‘ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार